Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Saturday, 14 July 2012

आयुष्यात खरच एक जोडीदार हवा!


आयुष्यात खरच एक
जोडीदार हवा!

एकमेकांना दिलेल्या दुःखांवर,
सोबत घालवलेल्या अनेक
... आनंदी क्षणांचा लेप
लावण्यासाठी..
अनेक
जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या,
डोळ्यातील आनंदाश्रु
पुसण्यासाठी…..


आयुष्यात पुढे
येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात
चेहरा लपवून मनसोक्त
रडण्यासाठी!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर
येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा हात
धरण्यासाठी एकमेकाला सावरण्यासाठी….

आयुष्यात खरच एक
जोडीदार हवाच!

No comments:

Post a Comment