Hello Friends !!, Always remember to be happy because you never know who's falling in love with your smile.
Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!
Tuesday, 30 August 2011
कधी असेही जगून बघा…..
किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….. ,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….. ….. ?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा….. ?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….. ?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….. ?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले
आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
Wednesday, 17 August 2011
जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....
कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???
त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...
बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात
१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......
Friday, 12 August 2011
कार्ट प्रेमात पड़लय................
हळूच हसतय
कधी कधी रुस्तय
जेवताना उठतय
ग्यालरित बसतय
विचारात असतय
गुपचुप हस्तय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधल पट्टी करतय
घरी नीट बोलना
रस्त्याना नीट चालना
सुट्टीत घरी थामबना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुनाकड़ देईना
बाथरूम मधे पण मोबाइल घेउन जातय
लग्नाचा विषय काढला की भांडंन काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षण दिसली की समजायच....... कार्ट प्रेमात पड़लय................

Must read for all "MARRIED" & "TO BE MARRIED" people.
अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि
'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे.
तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे
मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं. नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा
दृष्टिकोन कसा असावा, त्याबद्दल नेटवरून फिरणारा हा इ-मेल बरंच काही
सांगून जातो...
.. .. .. .. .. ..
- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल. त्यावेळी जरा हे
वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच
किंवा तुझ्या बहिणीसारखं...
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या
या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या
प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून
ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची
अपेक्षा असेल,
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी
अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा
प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही
तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने
तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको... यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही...
- आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती
प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते...
- पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही
तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले
पुरुष सहकारीही... तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या
भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण
तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.
- स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तू मदत केली आणि
विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.
- या अनोळखी घरात केवळ तू एकच तिच्या ओळखीचा, जवळचा आहेस, त्यामुळे तुझी
मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि
प्रेम मिळावं, अशी तिची अपेक्षा असेल.
पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
Must read for all "MARRIED" & "TO BE MARRIED" people.
प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,
लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,
हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,
हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
हसली तर फसली, आता तर नक्की पटली,
इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,
भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,
भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
पावसाचे दिवस म्हणजे आयत्या वर कोयता,
ओलाव्यात त्याच बरच काही फावल,
पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,
अंधारी रात्रि आता काही खर नाही……
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
ओलाव्यात त्याच बरच काही फावल,
पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,
अंधारी रात्रि आता काही खर नाही……
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
Traffic Jam म्हणुन टैक्सी हि थांबली,
तो किवा ती थांबनारयातले नव्हते,
त्यांचा तरी काय टाइम पास….मग काय
केला एकमेकांवर जोर …होण्याला कोण थांबवेल ?
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
तो किवा ती थांबनारयातले नव्हते,
त्यांचा तरी काय टाइम पास….मग काय
केला एकमेकांवर जोर …होण्याला कोण थांबवेल ?
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
निसर्गाची साथ प्रेमाची जात समुद्राची लाट,
किनारयावर कधी ना कधी आदलनारच,
ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,
कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
किनारयावर कधी ना कधी आदलनारच,
ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,
कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
संध्याकाळची वेळ होती,
एकमेकांला भेटायची ओढ़ होती,
बागेत काहीतरी गड़बड़ होती,
झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,
होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
एकमेकांला भेटायची ओढ़ होती,
बागेत काहीतरी गड़बड़ होती,
झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,
होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
आमच्या तुमच्या पूर्वजानी आणखी वेगळ ते काय केल?
तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!

खरं प्रेम सुरू होतं लग्नानंतर !!
खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

Thursday, 11 August 2011
तिने कित्ती सुंदर दिसावं..

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!
तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!
अबोल प्रेम....
हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
न बोलताच संपणार आहे?
भेट-वेळ रोजची ठरलेलीचतरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !
भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !
मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?
न बोलता बोललेले शब्द
तुला वेडीला कळणार आहे?
मी बोललो न बोललो तरी गप्पचनेहमीसारखी तू राहणार आहे !
भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे
स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसलो तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

Subscribe to:
Posts (Atom)