मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...
दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...
आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...
कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही...
मराठी मुलगी
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी
ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी
म्हणते छेडू नकोस मला बाप माझा घालेल गोळी
हसून घेते चिमटे हळूच मुलगी हि मराठमोळी
नको समजू साधी भोळी जरी नेसते साडी चोळी
या वर्षी तरी देवा मला एक gf दे ..
गोरी गोरी नसली तरी चालेल सावळी दे..
श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे..
जी माझ्या मनाला समजेल ....
जी माझ्या हृदयाला जपेल ...
...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या gf ला बघत आलो..
गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
कुठे तरी सेटिंग लाऊन दे..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
माझ्या हातात तिचा हात येऊ दे...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी जीवनात माझ्या सुख आणेल..
माझी स्वप्ने पूर्ण करायला मदत करेल..
जी दुखात माझ्या सहभागी असेल..
अश्रू पुसायला प्रथम तिचा हात असेल..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी मी काळा का गोरा बघणार नाही..
नको त्या अपेक्षा करणार नाही..
जी मी श्रीमंत का गरीब पाहणार नाही..
नको त्या कारणावरून भांडणार नाही...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवेल..
काटेरी रस्त्यावर चालताना हात सोडणार नाही..
जी विश्वासघात करणार नाही..
प्रेमामध्ये कधी स्वार्थ बघणार नाही..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
आता तरी माझी हवा होऊ दे..
आपल्याकडे पण आहे चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू दे...
आपल्याकडे पण आहे पार्टी..
एक एक बियर होऊन जाऊ दे...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
वाट बघून बघून थकलो रे मी
काही तरी जुळवून दे..
स्वप्ने बघून बघून वेडा होईल रे मी..
काही तरी मिळवून दे...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
ह्या वर्षाकडून खूप केल्या आहेत अपेक्षा ........
करू नको उपेक्षा..
ह्या देवाकडून खूप आहेत आशा ...
करू नको निराशा..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे.. plz plz plz.. :)
मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं
तुला नाही समजली माझी कविता? चालेल
हिशोब समजतोय ना? खूप झालं
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं.....