Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Saturday, 14 July 2012

आयुष्यात खरच एक जोडीदार हवा!


आयुष्यात खरच एक
जोडीदार हवा!

एकमेकांना दिलेल्या दुःखांवर,
सोबत घालवलेल्या अनेक
... आनंदी क्षणांचा लेप
लावण्यासाठी..
अनेक
जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या,
डोळ्यातील आनंदाश्रु
पुसण्यासाठी…..


आयुष्यात पुढे
येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात
चेहरा लपवून मनसोक्त
रडण्यासाठी!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर
येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा हात
धरण्यासाठी एकमेकाला सावरण्यासाठी….

आयुष्यात खरच एक
जोडीदार हवाच!

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते....♥♥♥♥!!


खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचेकाहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीचका खरे नसते???
तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थीहोते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणूमोरपीस होते
... मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठीशेवटच होतेमैत्रीच्याह पुढे पाऊलटाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हातीघेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशीलयाचीच वाट पाहत राहिले..
तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूपमौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासूनदुरा वण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावरतेवढच प्रेम करत होते
मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठीअखेरच होते
नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाचीचाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्याएवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठीकधीच खर नसेल???
खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठीआखेरं असेल? —



Monday, 9 July 2012

तिची ती नजर...!


तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
... ... ... डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची

तिची ती नजर
मला बर्‍याचदा होकार कळवुन जायची !
 

Saturday, 7 July 2012

प्रेम करणं सोपं नसतं......♥♥♥♥!!


प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
... कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावंलागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.....