Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Tuesday, 21 August 2012

तुला पाहिलं की......!!


तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात

...तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात
तुला घेवून मन
नभात उडून जात

तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात

तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात

तुला पाहिलं की
मन वेड होत
कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात .




 

Saturday, 18 August 2012

आयुष्यात प्रेम करायचय मला ...♥♥♥♥!!

 


दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,

आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
                         आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
                         आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता
पटकन मिठीत घ्यायचय तिला
                        आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
                      आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
                      आयुष्यात प्रेम करायचय मला...




कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती... !!


कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...

एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते

जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते

साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते

पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते

लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते

बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते





तुझ्यासारखं !!"


" प्रेयसी :- असे काय बघतोस ?

प्रियकर :- अरे !!! .... चंद्राला तासन-तास बघत बसलो, तरी तो काही बोलत नाही !!

प्रेयसी :- हो का ? ... मग चंद्रालाच बघना !!

प्रियकर :- बघितले असते ..... पण तो मला श्वास व जीवन

जगण्याची आशा नाही देऊ शकत ..... तुझ्यासारखं !!" ♥ ♥ ♥

♥ Love is sweet ...Is't It ? ... Keep Loving Truly ♥





 

Friday, 17 August 2012

तुझ्याजवळ खुप जवळ असावंसं वाटतंय...!!


तुझ्याजवळ खुप जवळ
असावंसं वाटतंय . . .
ओंजळीत तुझ्या अलगद येऊन
मिटावंसं वाटतंय . . .

केसांतुन तुझी हळुवार बोटं,
लहरावंसं वाटतंय . . .
माझ्या ओठांवर तुझे शब्द,
गावंसं वाटतंय . . .

क्षीण झालेला अश्रु
बिचारा उगीच कण्हतोय . . .
मनातला मऊ स्पर्श,
माझ्यामधे रमतोय . . .

माझा आळसही हलके हसुन
तु झेलावा वाटतंय . . .
क्षण जादु भरे सुगंधी व्हावे,
सुगंधालाही वाटतंय . . .

आपल्यामधलं निष्ठुर अंतर
कमी व्हावं वाटतंय . . .
चौकटीच्या परिघावरती
तूच असावं वाटतंय!


थांब जराशी...!!


जाउ नकोस अशी सांज अजुन ढळली नाही
थांब जराशी..तुझ्या केसांत लाली अजुन माळली नाही

असा ना किंतु मनात साठवु जराही तु
प्रिये प्रित माझी अजुन मळली नाही

ठाउक मज बदनाम प्रेमात तुझ्या जरी
रित जगाची तरी कधी मी पाळली नाही

मी कधीचा गप्प... तुझ्या नयनांशीच बोलतो आहे
मौनाची भाषा माझी तुज अजुन कशी कळली नाही

मला टाकुन अशी जाउ नकोस आता
थांब जराशी तुही...वाट तुझी मी कधी टाळली नाही...


तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडीमोलाचे हि नसेन...



आयुष्यत देवाकडे पहिल्यांदा मागणी केली

तू सुखी रहावीस म्हणून विनवणी केली

तू कितीही रागावलीस तरी माजे मन मोडणार नाही

कारण,तुझ्याशिवा य दुसऱ्या कुणावर माझा जीव जडणार नाही

तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजाच असेन

कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडीमोलाचे हि नसेन


Saturday, 14 July 2012

आयुष्यात खरच एक जोडीदार हवा!


आयुष्यात खरच एक
जोडीदार हवा!

एकमेकांना दिलेल्या दुःखांवर,
सोबत घालवलेल्या अनेक
... आनंदी क्षणांचा लेप
लावण्यासाठी..
अनेक
जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या,
डोळ्यातील आनंदाश्रु
पुसण्यासाठी…..


आयुष्यात पुढे
येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात
चेहरा लपवून मनसोक्त
रडण्यासाठी!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर
येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा हात
धरण्यासाठी एकमेकाला सावरण्यासाठी….

आयुष्यात खरच एक
जोडीदार हवाच!

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते....♥♥♥♥!!


खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचेकाहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीचका खरे नसते???
तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थीहोते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणूमोरपीस होते
... मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठीशेवटच होतेमैत्रीच्याह पुढे पाऊलटाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हातीघेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशीलयाचीच वाट पाहत राहिले..
तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूपमौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासूनदुरा वण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावरतेवढच प्रेम करत होते
मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठीअखेरच होते
नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाचीचाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्याएवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठीकधीच खर नसेल???
खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठीआखेरं असेल? —



Monday, 9 July 2012

तिची ती नजर...!


तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
... ... ... डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची

तिची ती नजर
मला बर्‍याचदा होकार कळवुन जायची !
 

Saturday, 7 July 2012

प्रेम करणं सोपं नसतं......♥♥♥♥!!


प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
... कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावंलागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.....


Friday, 15 June 2012

ऐक सुंदर प्रेम कथा.....♥♥♥♥!!


ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन
जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते .
कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर
... ... त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
... आणि जर
त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर
त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणारअसतो
मुलगा त्या खुर्ची वर बसतो
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल
दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो
मुलगी : घाबरू नकोस . देवाची काहीतरी चूक झाली असेल
हि खुर्ची बनवताना
आपण परत एकदा प्रयत्न करून बघू
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच
हिरवा दिवा पेटतो )
काही कळल का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्याखुर्चीवर बसला
तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर
असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खर खुर
प्रेम करू लागला
यालाच म्हणतात प्रेम ............... ..

म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम
सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास
कुठेही कमी झाला नाही पाहिज...


Wednesday, 6 June 2012



मन वेडं,
प्रत्येकाच असतं
कुणाच कमी,
कुणाच जास्त असत..

...
मन वेडं...
कधी ना कधी नक्की फ़सतं
कुणाच रडत बसतं
कुणाच उगाचच् हसतं

मन वेडं...
हे खुप नशीबवान असतं
आपल्याच नकळत हे तिच्यासोबत असतं

मन वेडं...
हे पाखरां सारख असतं
ते पंखाने उडत असतात
हे मात्र
पंखाविना उडत असतं

मन वेडं...
हे कधीच आपलं नसत
ते फ़क्त तिचच असत
कधी हरवल तर्
तिच्या सावली मागे सापडतं....

मन् वेडं
प्रत्येकाच असतं
कुणाच कमी
कुणाच जास्त असत....
 
 
 

Wednesday, 30 May 2012

एकदाच मला भेटशील का....??


 
वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?...
पूर्वी तू माझ्याशी
...
खुप काही बोलायचीस
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचीस
नसले विषय तरी
नविन विषय काढायचीस...
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचीस
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचीस
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचीस,
माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचीस
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...
आज ही मला तुझा
प्रत्येक क्षणी भास होतो
का गं अशी वागतेस
का देतेस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर माझा श्वास
शेवटचं एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास...
वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?
 
 

Tuesday, 29 May 2012

"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??





"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??
तुला काय वाटतं... मला तुझी आठवण य...
ेत नाही... ??

ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायला नसेल जमत मला...
पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...

... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... " 'त्याची काळजी घे रे देवा, वेडा आहे तो' असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धा हिस्सा आजही तूच नेतो.. !!!!!

एवढंच की मी कधी ते बोलून दाखवलं नाही...
जखम झालीये मलापण पण मी ती अजून कोणाला खोलून दाखवली नाही...

हो रडले मी... एकट्यात खूप रडले..
तू नाही म्हणाला होतास तरी रडले...
पण ते नव्हतं तुला दुखावण्यासाठी...
एक भाबडी आशा होती ती..
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी ...


Thursday, 3 May 2012

मी एकटाच असेन..!!


तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

...
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !


तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..

Friday, 23 March 2012

मी तुझ्याशी भांडतो.....!!



ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...

ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
...

ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...

मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...

अन

मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'....

 
तो: पण तसं काहीही नाहीये ;)...

Thursday, 23 February 2012

खरे प्रेम.....!!


प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?

प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणतआहेत .....!!

प्रेयसी :- हे tension मला पण आहे ............ पण म्हणून मी पिते का सिगारेट ?

प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना......... !!!

प्रेयसी :- अरे म्हणून काय,सिगारेट, दारू, चीडचीडपणा......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?

प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसेसमजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ............... ...

प्रियकर :- म्हणजे ?

प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..

प्रियकर :- कुठे ?
(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते............... . मंदिरात आल्यामुळेत्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो

नाराजीनेहाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो)
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपतीबाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक

दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट

तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!!

Sunday, 12 February 2012

माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे......


 
जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...मी म्हणलो...
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे...
" तू विचारलस "ते काय असत ..?"

... ... आठवतंय..? मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!

३५ व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो..तू आणि मी सोबतच डिनर घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!

माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच म्हणालो..."I love you very much "
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे आगी २० वर्ष आधी पासून माहित आहे.." आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!

तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...तू मला खूप आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज झालाय ना..?"

मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठी..मी म्हणालो "माझ तुझ्यावर अजून हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत.."

माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते ...कारण आज इतक्या वर्षांनी ...तू स्वतः म्हणाली होती...तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!

{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर आहे....म्हणून जेव्हा पण

संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)-

Friday, 27 January 2012

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,



मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...


स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...


दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...


आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...


कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही...


हे आहे खरे प्रेम - हृदयस्पर्शी प्रेम कथा




Wednesday, 18 January 2012

मराठी मुलगी........

मराठी मुलगी
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी

म्हणते छेडू नकोस मला बाप माझा घालेल गोळी
हसून घेते चिमटे हळूच मुलगी हि मराठमोळी

नको समजू साधी भोळी जरी नेसते साडी चोळी

 

Tuesday, 10 January 2012

या वर्षी तरी देवा मला एक gf दे ......

या वर्षी तरी देवा मला एक gf दे ..
गोरी गोरी नसली तरी चालेल सावळी  दे..
श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे..
जी माझ्या मनाला समजेल ....
जी माझ्या हृदयाला जपेल ...
...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या gf ला बघत आलो..
गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
कुठे तरी सेटिंग लाऊन दे..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
माझ्या हातात तिचा हात येऊ दे...


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी जीवनात माझ्या सुख आणेल..
माझी स्वप्ने पूर्ण करायला मदत करेल..
जी दुखात माझ्या सहभागी असेल..
अश्रू पुसायला प्रथम तिचा हात असेल..


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी मी काळा का गोरा बघणार नाही..
नको त्या अपेक्षा करणार नाही..
जी मी श्रीमंत का गरीब पाहणार नाही..
नको त्या कारणावरून भांडणार नाही...


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवेल..
काटेरी रस्त्यावर चालताना हात सोडणार नाही..
जी विश्वासघात करणार नाही..
प्रेमामध्ये कधी स्वार्थ बघणार नाही..


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
आता तरी माझी हवा होऊ दे..
आपल्याकडे पण आहे चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू दे...
आपल्याकडे पण आहे पार्टी..
एक एक बियर होऊन जाऊ दे...


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
वाट बघून बघून थकलो रे मी
काही तरी जुळवून दे..
स्वप्ने बघून बघून वेडा होईल रे मी..
काही तरी मिळवून दे...


या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
ह्या वर्षाकडून खूप केल्या आहेत अपेक्षा ........
करू नको उपेक्षा..
ह्या देवाकडून खूप आहेत आशा ...
करू नको निराशा..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे.. plz plz plz.. :)

Thursday, 5 January 2012

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही........


मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं


तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं


काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं


नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं


मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं


तुला नाही समजली माझी कविता? चालेल
हिशोब समजतोय ना? खूप झालं


नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं.....