Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Monday, 9 July 2012

तिची ती नजर...!


तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
... ... ... डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,

तिची ती नजर
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची....!

मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची

तिची ती नजर
मला बर्‍याचदा होकार कळवुन जायची !
 

No comments:

Post a Comment