Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Wednesday, 30 May 2012

एकदाच मला भेटशील का....??


 
वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?...
पूर्वी तू माझ्याशी
...
खुप काही बोलायचीस
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचीस
नसले विषय तरी
नविन विषय काढायचीस...
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचीस
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचीस
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचीस,
माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचीस
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...
आज ही मला तुझा
प्रत्येक क्षणी भास होतो
का गं अशी वागतेस
का देतेस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर माझा श्वास
शेवटचं एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास...
वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?
 
 

Tuesday, 29 May 2012

"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??





"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??
तुला काय वाटतं... मला तुझी आठवण य...
ेत नाही... ??

ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायला नसेल जमत मला...
पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...

... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... " 'त्याची काळजी घे रे देवा, वेडा आहे तो' असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धा हिस्सा आजही तूच नेतो.. !!!!!

एवढंच की मी कधी ते बोलून दाखवलं नाही...
जखम झालीये मलापण पण मी ती अजून कोणाला खोलून दाखवली नाही...

हो रडले मी... एकट्यात खूप रडले..
तू नाही म्हणाला होतास तरी रडले...
पण ते नव्हतं तुला दुखावण्यासाठी...
एक भाबडी आशा होती ती..
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी ...


Thursday, 3 May 2012

मी एकटाच असेन..!!


तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

...
तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !


तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..