Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Friday, 10 May 2013

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥



एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम
करीत
असतो,
पण तिला सांगायला तो घाबरत असतो..
एक दिवस तो तिला
... i love u बोलायचं ठरवतो,
आणि देवाकडे प्रार्थना करुन सांगतो कि,
मी तिला एकदाचं
आणि शेवटचं प्रप्रोज
करतोय,
प्लीज तिचं उत्तर
'हो,
असु दे...!!
.
.
.
.
त्या रात्री तो
'i love u'
मॅसेज टाईप करुन
तिच्या नंबर वर
पाठवतो आणि झोपतो..
काही वेळाने
त्याच्या मोबाईल वर एक मॅसेजटोन
वाजते,
पण तो मॅसेज
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करुन
देवाचं दर्शन घेऊन
झाल्यावरचं वाचेल,
असे ठरवतो आणि झोपून
जातो..
.
रात्रभर तो त्याचं मुलीची स्वप्न
बघतो..
सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर
तो मॅसेज
वाचतो,
तर त्यात लिहलेला असतं..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
A/C Balance Is
Insufficient.
Main Bal Is Rs. 0.08.
Msg Can Not Be
Delievered..

प्रेम....♥♥♥♥!!



देव :- तिची एवढी वाट बघू नकोस,
ह्या जन्मी ती तुला मिळणार नाहीये !!


प्रियकर :-वाट बघण्याची मजा घेउं दे मला,
पुढल्या जन्मी तर शक्य आहे.


देव :- एवढे प्रेम करू नकोस...,
पस्तावशील !!


प्रियकर :- बघुयात कि,
तू माझ्या आत्म्याला केवढं तडपावशील.


देव :- सोड तिला,
तुला स्वर्गातील अप्सरा दाखवितो!!


प्रियकर :- खाली येऊन बघ तिला,
तुला स्वर्गातील अप्सरा विसरायला लावतो.


देव :- हे बघ,
तू हे विसरू नकोस कि,
तू एक मनुष्य आहेस !!


प्रियकर :- मग मला ती मिळून दे,
आणि सिद्ध कर कि,
तू देव आहेस...~



तुझ्याशिवाय.....♥♥♥♥!!



ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट
घ्यायचा होता..
ती त्याच्यासोबत होती..
... त्याने तिचा हात
पकडला होता..

अचानक तिचा हात
निसटला...त्याच् या हातातून...
खूप
गर्दी होती..
त्याच्या थोड्यावेळाने लक्षात
आला कि तिचा हात
सुटला आपल्या हातातून..
तो कावरा-बावरा होऊन इकडे
तिकडे तिला शोधू लागला..
त्याला काही सुचेचना..
घामफुटायला लागला होता..

इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली..
लोकेट बघत होती..
तो त्या दुकानात आला..
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला,
ती वळून म्हणाली,
"छान आहे ना..??"
आणि तिने
त्याच्या डोळ्यात पाहिलं,
त्याचे
डोळे पाणावले होते..
तिने विचारलं,
"काय झालं..??"

त्याने तिला आवेगाने hug केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला,
"तुला आवडली आहे का ती चेन..??"
ती म्हणाली,
"हो, खूप."
तो म्हणाला,
"मग
हि तुला माझ्याकडून गिफ्ट."
"कसलं गिफ्ट..??
अरे माझा वाढदिवस
खूप दूर आहे अजून.."
तो म्हणाला,
"हे
माझा पहीला valentine गिफ्ट
तुला.."
ती म्हणाली,
"are you
proposing me..??.."
तो म्हणाला,
"हो,
कारण आज जेव्हा तुझा हात
माझ्याहातून
सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय
किती incomplete आहे मी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ
नकोस, मी...मी.."
ती लगेच म्हणाली,
"नाही जाणार..
कधीच
नाही....
नेहमी तुझ्या सोबत
राहील, शेवटच्या क्षणापर्यंत.."


 

Wednesday, 8 May 2013

असं असतं का प्रेम...♥♥♥♥!!


एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमे...चे टाके
काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर
होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय.


... डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची
जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा
मारत होते.


""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''
""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये
जायचंय.''
""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''
""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''
""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही
करतील...?''
""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत
नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता
करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?''

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत
नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं
जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या
मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर
कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या
गृहस्थांसारखं.''


अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-
""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे
वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.''
यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही
हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं...
खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?..




Tuesday, 7 May 2013

प्रेम खूप नाजूक भावना असते...♥♥♥♥!!


एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून बसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..
"मी आहे ...तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?"
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?


... कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील? कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील? कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?
बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील, समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल, ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?


कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाइलवर लक्ष नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?


मी नसेन तर,
तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुंदर धुनही बेकार वाटेल, पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील..
दिवसभर दुसर्‍यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील, उगाच किनार्‍यावर माझी वाट बघशील...
संध्याकाळी हुर-हुरशील, माझ्या आठवणीने बेचैन होशील...


मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील,
गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील, मी नजरेस पडणार नाही,
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील कुठेतरी...
तू लाख स्वत:ला रमवशील, दुसर्‍यांमध्ये स्वत:ला हरवशील, नवीन नात्यांना जोडशील....
पण खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले, आणि त्याने जोराची मिठी मारली तिला,,
तो म्हणाला, "तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जनू मी शेवटचे श्वास मोजत होतो, तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू, एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरच हृदयापासून तू मला हवियेस,
आणि एक सांगू"
ती बोलली काय..
तो म्हणाला " Sorry, I Love you"


मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असते त्याला जपून ठेवा, छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चाताप बनु शकते —



Monday, 6 May 2013

खरे प्रेम..♥♥♥♥!!


प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे
बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे
बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
...

प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण
बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्या शुभ्र
सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम
करतो"


प्रेयसी :- ते कसे ?

प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते
तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे
उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते
मात्र त्या तलावा बरोबरच
मरते...




Friday, 3 May 2013

प्रेम करतो तुझ्यावर......♥♥♥♥!!


तो: काय ग...आज रडलीस वाटत?
कोणाशी तरी भांडलीस वाटत?
.
ती: तुला कस कळाल?
तो: हो कि नाही ते सांग
... .
ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना
.
तो: कळाल कस तरी...
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?
.
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?
.
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?
.
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?
.
कस कळत रे
तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?
.
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?
.
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?
.
सांग ना...
कस कळत रे तुला,
माझ्या मनातल सगळ?
.
तो: अग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार
.
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार
.
सांग ना
कोण सांभाळणार