Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Tuesday, 30 April 2013

एक सुंदर स्टोरी...♥♥♥♥!!


ती : तू माझ्याशी भांडत नकोजाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही तेवढं
सोडून बोल
... मी तर भांडणार...
.
ती: किती नालायक आहेस काय
मिळतं तुला माझ्याशी भांडून...
.
तो : हो, नालायक तर आहेच अगं ते गाणं
नाही ऐकलयेस का ??... "कोई हसीना जब
रूठ जातीहै तो और भी हसीन हो जाती है".
.
ती: हो ऐकलय..
तो: पण तसं काहीही
नाहीये...
.
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५
चापटा मारत)...जा बाबा.. जा
.
तो: अरे
हो हो...बरं ठीक आहे..
आता ऐक... मी तुझ्याशी भांडतो...
भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस
ना त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो.
.
तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द
पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो.
.
"आजपासून बिलकुल बोलू नकोस
माझ्याशी" हे वाक्य
म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज
ऐकण्यासाठी.
मी तुझ्याशी भांडतो.
.
चेहऱ्यावर राग असतांना देखील
एका अनामिक ओढीने माझ्याकडे
बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी..
.
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट
मिठीत
घालवता येणाऱ्या.......
त्या अविस्मरणीय क्षणांसाठी..



Monday, 22 April 2013

तुझ्याशी खुप काही बोलावं ♥♥ !!



प्रियकर : तू
येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं

पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेसना
की मग वाटतं, बस तुला बघतच रहावं

♥♥

प्रेयसी : मी ही घरून विचार करूनच
निघते
की आज तुला खुप काही सांगावं


पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं
जावू देत त्या गप्पा, असच पडून
रहावं


♥♥

Saturday, 20 April 2013

प्रेम म्हणजे नक्की काय असते..♥♥??.."



एकदा सहज बागेत
बोलता बोलता ती मला म्हणाली,
"प्लीज सांग
मला तु हे प्रेम म्हणजे नक्की काय असते..??.."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तेव्हा मी थोड हसुन म्हणालो,
"अगं वेडी प्रेम
म्हणजे एक नाव असतं..
मनातल्या मनात गजबजलेल तिच एक गाव असते..
असतं जवळ तेव्हा किंमत नसते पण जेव्हा जाते दुर
तेव्हा जिवण शुन्य करुण जाते.."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तेव्हा ती म्हणाली राज मला नाही समजलं..
प्लीज समजुन सांगना..
तेव्हा मी म्हणालो,,
ठिक आहे तर नीट ऐक,,
"राधेने नी श्री कृष्णा शी केले ते प्रेम असते..
सीतेने रामावर केले ते देखील प्रेम असते..
गरिब सुदामाने आपल्या मित्रावर म्हणजे
श्री कृष्णा वर केले ते देखील प्रेम असते.."
तेव्हा ती निरागस चेहऱ्याने ती माझ्याकडे
पाहत ती म्हणाली..
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
' I am so so confuse राज..'
प्लीज या जगातील सर्व श्रेष्ठ प्रेम कोणते ते
सांगना मला..??

तेव्हा मी तिला म्हणालो
"अगं किती सोपे आहे ते,
ओ के तर ऐक मग.."
"लहानस्या वासराला जेव्हा गाय मायेनी चाटते
ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
घाबरलेल्या आपल्या बाळाला जेव्हा आई प्रेमाने
कवटाळते ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
आणि,
आपण जेव्हा आपल्या आई आणी बाबा च्या प्रेमाने
पाया पडतो ते जगातील सर्व श्रेष्ठ प्रेम असते..."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥


Thursday, 11 April 2013

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी ♥♥♥♥!!



♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी ♥

प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....

प्रेयसी :- छान...!!, मोठ्ठी पार्टी पाहिजे मग आता..... :-))
...
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे खूप मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )


प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे मॅनेज केलेस ???

प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥

खरे प्रेम..!!



आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसीअसणे
म्हणजेच प्रेम नसते

रोज रोज"आय लव्ह यु"म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते........

... तर आपल्या आयुष्यात
... कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...

ते केवळ"तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
वाटतो तेच आहेत तुमचे"खरे सोबती... .
हेच खरे प्रेम आहे... .



 

Friday, 5 April 2013

छान प्रेमकथा :


एक हवाई सुंदरी होती,
ती दिसायला तर सुंदर होतीच
पण त्यापेक्षाही सुंदर
तिची आपल्या नवर्यावर प्रेम
करण्याची पद्धत होती ..............
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात
असे तेव्हा तेव्हा ती रोज एक
गुलाबाचे फुल
आपल्या नवर्याला पाठवत असे,
आणि जाणवून देत असे
कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ............... .....
ती दुसरीकडे
असताना तिच्या रोज
येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद
सवय झाली होती ...........
पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे
सुंदर प्रेम देवालाही आवडले
असावे म्हणून कि काय पण देवाने
तिला आपल्याकडे बोलावून
घेतले, तिच्या विमानास
अपघात झाला आणि बिचारी आपले
प्राण गमावून बसली ............... ......
हि बातमी ऐकून
तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात
तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके
कोणी एवढे रडले नसेल ............... ...
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते
तर आता सुरु झाले होते,
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील
रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते........... ....
हे बघून तिचा नवरा आश्चर्य
चकित झाला व ह्या मागाचे
कारण शोधण्यासाठी त्याने
रोज फुल घेऊन येणार्या मुलास
विचारले तिचा नवरा :- तुला हे फुल कोण
देत नक्की, माझी बायको मरून
१५ दिवस झाले तरी तू रोज फुल
आणून देत आहेस, नक्की प्रकार
काय आहे ?

मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप
प्रेम करते,
तिची विचारशक्ती खूप
पुढची होती, म्हणून तिने आधीच
विचार करून ठेवला होता कि,
"जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण
प्रेमाला कधी संपवायचे नाही"
आणि ह्या विचाराने तिने
मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले
आहेत जेणे करून आयुष्यभर
ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....
आणि तिचे नसणे
सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव
करून देईल.