Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Friday, 30 December 2011

तुझ्या ओठांवरचा ओलावा......



कधी-कधी तुझ्या ओठांवरचा ओलावा मला दुष्कालातल्या पानाव्थ्यावरचा एक थेंब वाटतो
 तर कधी थंड दुधावर्ती तरंगणारी मंद-मंद साय वाटते.
 कधी-कधी भाजार्या उन्न्हात ओठांना गारवा देणारा लाल-बुंद गरीगारचा गोळा वाटतो,
 

तर कधी गरम-गरम कॉफीवर जमलेल्या फेसाळ बुड-बुडयांचा मेळा वाटतो.
 कधी-कधी चिंब करणारी पावसाची सर,
 तर कधी वाहून नेणारा प्रेमाचा पूर वाटतो.


 कधी-कधी पर्वतावर फसफस नारा ज्वालामुखी वाटतो,
 तर कधी शम्पिअनच्या बाटलीतून फसफसनार्या शम्पिअनसारखाच नशीला वाटतो.
 कधी-कधी पावसाची वाट पाहणाऱ्या मोराच्या ओलसर डोळ्यांप्रमाणे वाटतो,


 तर कधी पावसात चिंब भिजलेल्या मोराच्या तोरावर मोत्यांप्रमाणे सजलेल्या ओलसर थेंबाप्रमाणे वाटतो.
 असाच तुझ्या ओठांवरती मृगजळ होऊन चमचमणारा हा ओलावा ह्या सुकलेल्या, तहानलेल्या, माझ्या व्याकूळ ओठांना नेहमीच हवा हवा सा वाटतो,

 नेहमीच हवा हवा सा वाटतो.............................

आयुष्य....


जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं,

आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं,

तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो,
याचंच नाव 'आयुष्य' असतं !


Wednesday, 28 December 2011

प्रेम कधी नाही विचारत कि........??



♥ प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............
 ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"

प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ..........
ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"

प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ...........
ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"

प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ...........
ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"

प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" ..............
ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" ♥

♥ Keep Loving Truly ...... ♥

मराठी मस्तीखोर विनोद...........


प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा! एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये
तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"


वाघ: " अरे मारू नाहीतर काय? अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!"
"मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका........." :P :D


--------------------------------------------------------

एका माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो.
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो,
आणि काही प्रश्न विचारतो…..


माणूस – Who are you??
पोपट – I am Parrot.
माणूस – तुम कोण हो?
पोपट – मैं तोता हु l
माणूस – तू कोण आहेस???


पोपट – तुझा बाप !, २ वेळा सांगितले
तरी तुला समजत नाही का रे........ शिपुर्ड्या........????


(पोपट मक्या चा असतो... :P :P )
----------------------------------------------------------


एक अनोळखी कॉल

तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......:(
...
थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल


तो:-हे तुला bf आहे का ?? :P
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...तू आज माझ हृदय तोडलीस...:(
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो....



----------------------------------------

मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?
आई : पंढरपुरलां
मुलगा : बाबांचां?
आई : नागपुरला .
मुलगा : माझा आणि ताईचा ?आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .
मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?


-------------------------------
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.


इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.


"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि  मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

------------------------------------------------


एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.


डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......

डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.......:D

------------------------------------------------

Saturday, 24 December 2011

मी तुझ्यावर प्रेम करतो....:)


ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....


आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.


नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?


हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.


मी म्हणालो,..... अगं वेडे... 
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.


अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.


येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.


तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.


तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)

कधी कधी वाटतं..........



कधी कधी वाटतं........

तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....


तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...


मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........


तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....


हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....
मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....

अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....

Thursday, 22 December 2011

खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते.....??


एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले असते,


प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....
प्रत्येक मुलीला वाटते कि काहीतरी कारण आहे म्हणून तिचा प्रियकर तिच्यावर प्रेम करत असतो पण तसे नसते . जर दिखावा करायचा असेल तरच कारण असतात खरे प्रेम निशब्द असते .आणि हेच मुलींना समजत नाही.

तुझं आणि माझं जमणार तरी कसं.......??


तुला लागतो चहा मला लागते कॉफी,
तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी,
तुला वाटते थंडी मला होते गरम,
तु आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

झोपतेस तू लवकर आणि ऊठतेस पहाटे,
आवडत नाही तुला बॉक्सींग आणि कराटे,
मी माञ झोपतो बाराच्या नंतर,
रविवारी नसतं क्रिकेट शिवाय गत्यंतर,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

फिरायला आवडत आवडत तुला शॉपिंग,
कपड्याबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग,
मला माञ खरेदीचा येतो कंटाळा,
कळत नाही रंग आहे राखाडी का काळा,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

घालतो मी शर्ट ईस्ञी न करता,
जाऊन येतो एकटाच इतारंच ठरता,
तु माञ बघतेस मैञीणीची वाट,
बाहेर निघताना नखरे सञाशे साठ,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,
मला नसतात लक्षात बर्थडे तारखा,
जाताना बजावले तरी काम विसरतो सारखा,
तुला माञ आठवते पाचवीची मैञीण,
बारीक तुझी नजर डोळे आहेत कि दुरबिन ,
तुझ आणि माझ जमणार तरी कसं,
................................................
ऊन आणि सावली राहतात ना जसं, अगं !
 तुझं माझं जमेल का तसं.......??

राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर.........


दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .

पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.

प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,

कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.

अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,

डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.

दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरी ही मन तयार होतच नाही,

राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,

मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....

Wednesday, 21 December 2011

मराठी टाइम पास ..........!!



छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार - हो आहे ना...
मुलगी- मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते. :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------

संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .

रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?
संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे. :-D
------------------------------------------------------------------------------


टीसी- आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या.
आजीबाई- मी विद्यार्थी आहे.
टीसी- अच्छा, कोणत्या शाळेत
आजीबाई- ते कशाला सांगू?
टीसी- माझ्या आजीचे अँडमिशन करायचे आहे. :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------



न्यूटनच्या बायकोचा उखाणा
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं. :-D
------------------------------------------------------------------------------


गंपू- काय रे तू, रुग्णालयात लेडीज वॉर्डमध्ये का दाखल झालास? लाज वाटत नाही का?
झंपू- त्यात काय लाज वाटायची? माझा जन्मच लेडीज वॉर्डमध्ये झाला आहे. :- :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------


संता: अरे, ही न्‍यायदेवता अंध का झाली असेल?
बंता: संता, हे त्‍या रजनीकांतमुळे झाले आहे.
एकदा एका न्‍यायाधीशाने रजनीकांतला गुन्‍हा करतांना बघितले.
तेंव्‍हापासून न्‍यायदेवता अंध झाली आहे. :-D
------------------------------------------------------------------------------
चंपूराव - मी असे ऐकले की विवाहित स्त्रिया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपले पती मिळतात.
गंपूराव- हं.. असं मीही ऐकलंय खरं.
चंपूराव - मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?
गंपूराव - हिशेब साधा आहे, त्यांना सुद्धा आपल्या पत्नी मिळतील.
चंपूराव - अरेरे, मग स्वर्गात जाऊनही उपयोग नाही. हेच खरं.  :- :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------


पर्यटक - इथून स्टेशनला कोणती बस जाते?
गंपू - 20 नंबरची बस पकडा
पर्यटक - ती नाही आली तर?
गंपू - आली नाही तर 10-10 च्या दोन पकडा :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------


गंपू पेट्रोल पंपावर जातो. तिथे एक बोर्ड असतो.
त्‍यावर लिहिलेले असते की, 'येथे मोबाइल वापरण्यास बंदी आहे.'
तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो..
थोडा वेळ मला फोन करू नका रे..:-P
------------------------------------------------------------------------------


बायको : माझे दुर्दैव! तुमच्यापेक्षा चांगले चांगले आणि बुद्धिमान नवरदेव मिळत असताना
मी तुमच्याबरोबर लग्न केले!
नवरा : वेडे, ते माझ्यापेक्षा बुद्धिमान व सुंदर होते
म्हणूनच, तर तुझ्या तावडीत सापडले नाहीत. :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------
संताला त्याची मांजर खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी संता त्या मांजरीला लांब सोडून आला. पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती. दुस-या दिवशी संताने त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर.

संताला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने संताने बायकोला फोन करून विचारले, 'काय गं, मांजर घरी आली का?'
त्यावर बायको- 'हो, ती तर कधीच घरी पोचली.'
संता- 'मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा...मी रस्ता चुकलोय'. :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------

Wednesday, 14 December 2011

मलाही girl friend मिळावी.........!!




 सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
 आम्हा दोघांची मने जुळावी
 हातात हात घालून फ़िरणारी, 
मलाही girl friend मिळावी


हास्याच्या पहिल्या किरणाने,
 प्रितीची खळी उमलावी
 डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे, 
रूपाची ती राणी असावी


अशीच माझी स्वप्नसुंदरी,
 ह्र्दयाच्या नगरात रुळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी
 
आयुष्यातील सारी दु:खं,
 जिच्या सहवासात टळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी


द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
 आधी girl की आधी friend
  आयुष्यभराचं नातं हवं,
   देव करो तीच्याकडूनचं,
 प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी...!!



Monday, 12 December 2011

चार पावल.........


चार पावल पुढ गेलो की
पुन्हा पाठी फिरावस वाटत
चुकल्या नजरेंन मान
तिरपी करूंन
तुला पहावस वाटत

ऑफिस मधे निघालो की
तू खिड़की जवळ यायचीस
केसाचा बहाना करत
इशारा मला करायचीस

तुझा हसरा चेहरा पाहून
खुप आनंद वाटायचा
पुन्हा तोच हसरा चेहरा
घरी येताना दिसायचा

गाड़ी सावकास चालव
लवकर घरी ये
जेवलास का
चहा पिलास का
आय मिस यू
असे असंख्य मेसेज
करून तू खुप प्रेम करायचिस
गोड आयूश्याची स्वप्न रंगउन
खुप काही सांगायचीस

तू गावी गेलीस की
जिव कासाविस होयचा
तुझा चेहरा पाहन्या साठी
उर भरून यायचा

तू गावी जाताना
लवकर येते सांगुन जायचीस
ठरलेल्या दिवशी लगेच यायचीस

त्या दिवशी तू अचानक निघून गेलीस
का ग मला दुखाच्या खाइत सोडून गेलीस

आज तुझ्या सहवासाचा भास् मला होतो
दूर दुखाच्या जगात घेउन मला जातो


Sunday, 11 December 2011

तुझी वाट पाहताना दिवस संपतात..............



तुझी वाट पाहताना दिवस संपतात,

पण वाट पाहणं संपत नाही.


आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं

मला अजूनही जमत नाही.


का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?

का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता

पुन्हा वाहायला लागतात ?


का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत

राहते ?

का तुझी आठवण नको असताना येतच

राहते ??



Thursday, 1 December 2011

असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....


असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागत..........