Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Saturday, 20 April 2013

प्रेम म्हणजे नक्की काय असते..♥♥??.."



एकदा सहज बागेत
बोलता बोलता ती मला म्हणाली,
"प्लीज सांग
मला तु हे प्रेम म्हणजे नक्की काय असते..??.."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तेव्हा मी थोड हसुन म्हणालो,
"अगं वेडी प्रेम
म्हणजे एक नाव असतं..
मनातल्या मनात गजबजलेल तिच एक गाव असते..
असतं जवळ तेव्हा किंमत नसते पण जेव्हा जाते दुर
तेव्हा जिवण शुन्य करुण जाते.."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
तेव्हा ती म्हणाली राज मला नाही समजलं..
प्लीज समजुन सांगना..
तेव्हा मी म्हणालो,,
ठिक आहे तर नीट ऐक,,
"राधेने नी श्री कृष्णा शी केले ते प्रेम असते..
सीतेने रामावर केले ते देखील प्रेम असते..
गरिब सुदामाने आपल्या मित्रावर म्हणजे
श्री कृष्णा वर केले ते देखील प्रेम असते.."
तेव्हा ती निरागस चेहऱ्याने ती माझ्याकडे
पाहत ती म्हणाली..
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
' I am so so confuse राज..'
प्लीज या जगातील सर्व श्रेष्ठ प्रेम कोणते ते
सांगना मला..??

तेव्हा मी तिला म्हणालो
"अगं किती सोपे आहे ते,
ओ के तर ऐक मग.."
"लहानस्या वासराला जेव्हा गाय मायेनी चाटते
ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
घाबरलेल्या आपल्या बाळाला जेव्हा आई प्रेमाने
कवटाळते ते सर्व श्रेष्ठ प्रेम असते..
आणि,
आपण जेव्हा आपल्या आई आणी बाबा च्या प्रेमाने
पाया पडतो ते जगातील सर्व श्रेष्ठ प्रेम असते..."
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥


No comments:

Post a Comment