पप्पा माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V टेस्ट करा पप्पा त्याचा रंग सावळा असलातरी चालेल पण मनाने गोरा असावा... पप्पा त्याचे केस लाल असलेतरी चालेल पण हुंडयासाठी हाल हाल करून जाळून पोळून भाजून मारणारा नसावा ...... पप्पा त्याच्या चेहेर्यावर डाग असलातरी चालेल पण चरीत्र्यावर डाग नसावा ....... पप्पा त्याच्या डोक्यावर केस नसले तरी चालेल पण त्यावर डिपार्टमेंटची एकही केस नसावी ....... पप्पा त्यानी चटणी भाकरी खालली तरी चालेल पण व्याजाने पैसे काढून पाचपकवान खाऊ घालणारा नसावा...... पप्पा तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण रोज रात्री घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ...... पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे भोसलेसारखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मरणारा असावा पण एड्स सारख्या पांचट रोगाने मरणारा नसावा ..... पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन जागृती पोहाडे मानणारा असावा पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा ..... पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा देशासाठी फासावर जाणारा असावा ....... पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा जबडा फाडणारा असावा पण गुटकाची पुडी टरा टरा फाडणारा नसावा ..... पप्पा तो भावांमध्ये द्वेष करणारा नसावा, संत रोहीदास सारखा आई वडिलांची सेवा करणारा असावा ..... पप्पा त्याने जग नाही जिंकले तरी चालेल पण मला तरी जिंकणारा असावा . |
No comments:
Post a Comment