Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Tuesday, 4 October 2011

मराठी टाइम पास ..........!!



बाबा: पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी: काही नाही.  आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन.  आणखी काय करणार?
बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.  फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!
--------------------
गुरुजी: चिकू, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चिकू: काय करणार?  आईबाबा एकमेकांशी भांडत होते.
गुरुजी: तू तिथे काय करत होतास?
चिकू: भांडण संपण्याची वाट पाहत होतो, कारण दोघांच्याही हातात माझी एक-एक चप्पल होती.
--------------------
गुरुजी: मी तुम्हाला हिमालय बद्दल दोन दिवस माहिती सांगत आहे आता सांगा, हिमालय नसता तर काय झालं असता?
चिकू: गुरुजी, तुम्हाला दोन दिवस बोलावं लागलं नसतं.
--------------------
गुरुजी: तू सांग चिकू, जगात कुठेही लढाई का होऊ नये?
चिकू: लढाई म्हणजे इतिहास होतो आणि मग आम्हाला आठवून अभ्यास करावा लागतो.
--------------------
शहरात नवीन हॉटेल उघडलं. त्याचं नाव होतं 'टोप्लेस.'
थोडीशी जहिरातबाजी केल्यावर पहिल्याच दिवशी हॉटेलमध्ये हजारो लोकांची रीघ लागली.
पण सर्वांची घोर निराशा झाली.  कारण? ..... हॉटेलला छप्परचं नव्हतं!
--------------------
वकील: 'युअर ऑनर, या गृहस्थांना विचार कि, ते त्यांच्या सुंदर पत्नीला सोडचिठ्ठी का देऊ इच्छितात?'
गृहस्थ: जज्जसाहेब, मी घातलेले जोडे फार सुंदर, मुलायम आहेत.  पण ते किती चावतात हे फक्त मीच सांगू शकतो.  ते वकील साहेबांना कसं कळणार.'
--------------------
बाहेरगावी गेलेले दामुआण्णा हॉटेलमध्ये जेवणासाठी जातात.
दामुआण्णा (लेडीवेटरला): "माझ्यासाठी जळक्या पोळ्या, खारट वरण, ठीकात भाजी व कच्चा भात घेऊन ये आणि जेवत असताना माझ्यासमोर बसून कटकट कर ... मला आज घरची खूप आठवण येत आहे."
--------------------
कॅम्पातील वेस्ट एंड सिनेमागृहात काम करणाऱ्या डोअरकीपरला दातदुखीचा त्रास होत होतं.
तो एका दंत वैद्या कडे जातो.
दंतवैद्य: "बोला कोणता दात दुखात्तोय तुमचा?"
डोअरकीपर: "बाल्कनीत डावीकडून चौथा."
--------------------
लंडनच्या एका हॉटेलात एक इंग्रज व एक भारतीय बीफ स्टेक खात बसले होते.
इंग्रज: "काय रे तुमच्या भारतात गाय तर पवित्र मानतात ना?  आणि मग हे काय?"
भारतीय: "भारतातल्या गायी पवित्र असतात. इंग्लंडमधल्या नव्हेत.
--------------------
बाळू गेला सिनेमाला.
सिनेमा पाहून घरी आला.
पोटभर जेऊन झोपी गेला.
स्वप्नात आली जुही चावला.
उठून पाहतो ..... तर ढेकुण चावला.
--------------------
गुरुजी: चिकू, असा कसा रे तू?  मार खाऊनही हसतोस.
चिकू: गुरुजी, तुम्हीच तर सांगितलत कि संकटाशी हसत-खेळत मुकाबला करावा.
--------------------
वडील: चिकू, सर्वात संव्हारक शास्त्र कुठलं ते सांग?
चिकू: बाबा, आईच्या हातातलं लाटणं.
--------------------
प्रीतो (संताको): तुने मेरा "Mooli Da paratha" खाया ना?
संता: नही.
प्रीतो: झूठ मत बोल कमीने!  Lips can Lie, But Hips don't Lie!
--------------------
कोर्टात घटस्पोटची केस चालू होती.
वकील: म्याडम, त्या दिवशी तुम्ही त्यांना भेटलात?
बाई: हो भेटले.
वकील: ते काय म्हणाले.
बाई: या गोष्टी तुम्ही मला सांगू नकोस.  एखाद्या गाढवाला सांग.
वकील: त्या नंतर तुम्ही काय केलेत.
बाई: मी सगळं सांगायला तुमच्याकडे आहे.
--------------------
चंद्या एका मुलीला ' इंप्रेस ' करण्यासाठी काव्यात्मक मराठीत प्रपोस करत होता,"प्रिये, ओठ तुझे, गीत माझे, जीवन गाणे गाऊ का?"
मुलगी पण जाम हुशार, तिने उत्तर दिलं, "मुर्खा, गाल तुझे, हात माझे, कानाखाली लाऊ का?"
--------------------

No comments:

Post a Comment