Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Friday, 3 May 2013

प्रेम करतो तुझ्यावर......♥♥♥♥!!


तो: काय ग...आज रडलीस वाटत?
कोणाशी तरी भांडलीस वाटत?
.
ती: तुला कस कळाल?
तो: हो कि नाही ते सांग
... .
ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना
.
तो: कळाल कस तरी...
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?
.
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?
.
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?
.
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?
.
कस कळत रे
तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?
.
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?
.
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?
.
सांग ना...
कस कळत रे तुला,
माझ्या मनातल सगळ?
.
तो: अग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार
.
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार
.
सांग ना
कोण सांभाळणार


No comments:

Post a Comment