Welcome Friends !! Do Leave your Comments On My Blog/Posts !! Thanks !!


Wednesday, 14 December 2011

मलाही girl friend मिळावी.........!!




 सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
 आम्हा दोघांची मने जुळावी
 हातात हात घालून फ़िरणारी, 
मलाही girl friend मिळावी


हास्याच्या पहिल्या किरणाने,
 प्रितीची खळी उमलावी
 डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे, 
रूपाची ती राणी असावी


अशीच माझी स्वप्नसुंदरी,
 ह्र्दयाच्या नगरात रुळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी
 
आयुष्यातील सारी दु:खं,
 जिच्या सहवासात टळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी


द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
 आधी girl की आधी friend
  आयुष्यभराचं नातं हवं,
   देव करो तीच्याकडूनचं,
 प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी
 हातात हात घालून फ़िरणारी,
 मलाही girl friend मिळावी...!!



No comments:

Post a Comment